मोटारकार चालकाने दुचाकीवरील दोघांना नेले फरफटत   

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे एका मोटारकार चालकाने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी घडली.
 
निलेश दत्तात्रय पाटेकर (वय २२, रा. वाकी, खेड), नागेंद्र रामचंद्र प्रजापति (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारकार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निलेश पाटेकर आणि त्यांचा मित्र नागेंद्र प्रजापती हे दुचाकीवरून कामावर जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना खुंबरेनगर येथे त्यांच्या दुचाकीला मोटारकारने धडक दिली. धडक दिल्यानंतर मोटारकार चालकाने निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघांनाही फरफटत नेले. त्यानंतर मोटारकारचालक पळून गेला. या अपघातात निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles